Tue, Jul 16, 2019 09:41होमपेज › Pune › 48 तासांत ईशान्य भारतात धडकणार

मान्सून कर्नाटकात

Published On: May 31 2018 1:44AM | Last Updated: May 31 2018 1:44AMपुणे :  प्रतिनिधी 

केरळमध्ये मंगळवारी दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) वेगाने आगेकूच करत बुधवारी कर्नाटकात प्रवेश केला. संपूर्ण केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीचा भाग, दक्षिण कर्नाटक, अंतर्गत तमिळनाडूच्या भागात मान्सून पोहोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मान्सूनची उत्तर सीमा म्हैसूर, तूतीकोरिन अशी होती. येत्या 48 तासांत मान्सून ईशान्य भारतात दाखल होण्यास अनुकूल वातावरण आहे. 

24 तासांत केरळमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. अरबी समुद्रालगत उत्तर केरळ ते कर्नाटक किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने, मुसळधार पाऊस पडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली. पुढील 3-4 दिवसांत तेलंगणा, आंध्र प्रदेश, दक्षिण गोवा येथे मान्सून पोहोचण्यास अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.