Sun, Apr 21, 2019 14:12होमपेज › Pune › मध्य महाराष्ट्र, मुंबईमध्ये मान्सून; अतिवृष्टीचा इशारा

दरड कोसळल्याने, रत्नागिरी-राई-भातगाव- गुहागर मार्ग बंद

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 1:04PMपुणे : प्रतिनिधी

दक्षिण कोकणात शुक्रवारी दाखल झालेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) शनिवारी मुंबईसह मध्य महाराष्ट्रात डेरेदाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मध्य अरबी समुद्र व कोकणचा बहुतांश भाग, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातही मान्सून दाखल झाल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळदरम्यान समांतर कमी दाबाचा पट्टा असून, त्यामुळे येत्या 48 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबईत काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.

गेल्या 24 तासांत कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. वेंगुर्ला 270 मि.मी., हर्णे 100 मि.मी., मुंबई 40 मि.मी., सातारा 10 मि.मी., नगर 30 मि.मी., यवतमाळ 40 मि.मी. पावसाची नोंद झाली.

 

पावसाळ्यात महाड- पोलादपूर मार्गावर अपघाताचे जाळे?

* गुहागर- मांजरे गावात दरड कोसळली, रत्नागिरी-राई-भातगाव - गुहागर मार्ग बंद

रत्नागिरी जिल्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सकाळी रत्नागिरी राई भातगाव मार्गे गुहागर कडे जाणार्या मार्गावरील मांजरे गावात दरड कोसळली व रत्नागिरी कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली 

* कोल्हापुरातही पावसाची दमदार सुरुवात 

*मिरजेत सकाळी सकाळी सव्वा आठपासून संततधार