Sun, Dec 15, 2019 04:46होमपेज › Pune › अखेर मान्सून पुण्यात दाखल

अखेर मान्सून पुण्यात दाखल

Published On: Jun 24 2019 4:09PM | Last Updated: Jun 24 2019 3:56PM
पुणे : प्रतिनिधी 

नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) पुणे शहरात तब्बल १४ दिवस उशिराने सोमवारी (दि.२४) पुण्यात दाखल झाला. जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारलेला मान्सून पुणे शहरात सोमवारी दुपारी दाखल झाल्याचे पुणे वेधशाळेकडून जाहीर करण्यात आले. 

दुपारी सव्वा तीनपासून शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरात दुपारीच काळेकुट्ट ढग दाटून आले, त्यामुळे भर दुपारी अंधारून आले. दरम्यान, पुणे शहरात दरवर्षी सर्वसाधारणपणे मान्सून १० जून रोजी दाखल होतो. यंदाच्या वर्षी मात्र २४ जून रोजी त्याचे आगमन झाले असून मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणार्‍या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला. वायू चक्रीवादळामुळे मान्सून राज्यासह शहरात यंदा उशिराने दाखल झाला. पुढील २-३ दिवस शहर व परिसरात पावसाच्या काही जोरदार सरी बरसतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.