Fri, Apr 19, 2019 12:37होमपेज › Pune › तपासणीच्या नावाखाली महिलेचा विनयभंग

तपासणीच्या नावाखाली महिलेचा विनयभंग

Published On: Apr 10 2018 1:40AM | Last Updated: Apr 10 2018 1:30AMपुणे : प्रतिनिधी

कोरेगाव पार्क परिसरात वैद्यकिय शिबिरासाठी आलेल्या डॉक्टरने महिलेची तपासणी करताना तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात डॉक्टरविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

26 वर्षीय महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. गुरूगोकुल भास्करन गुरुस्वामी (वय 30, रा. रामकृष्ण स्ट्रीट, कोईम्तुर) याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला यांना पीसीओडी  आजारावर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा शोध घेत होत्या. त्यांना  डॉ. गुरूस्वामी याची फेसबुकवर माहिती मिळाली. पुण्यात डॉक्टरचा वैद्यकिय शिबिर असल्याचेही तिला फेसबुकच्या माध्यमातून समजले.

त्यामुळे महिलेने फेसबुकवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला आणि शिबिरासंदर्भात माहिती घेतली. त्यावेळी हे शिबीर  कोरेगावपार्क येथील रिव्हायटलाईड बोर्ड, बिझनेस सेंटर येथे असल्याचे समजले.  त्यानंतर तक्रारदार महिला आठ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास या शिबिरासाठी गेल्या. त्यावेळी डॉ. गुरूस्वामी याने तपासणी करण्याच्या नावाखाली महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.  डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहेत. 

 

Tags : pune, pune news, medical check up, woman, Molestation,