Thu, Jul 18, 2019 12:17होमपेज › Pune › मोदींच्या आश्‍वासनांचा त्यांच्याच खासदारांना विसर

मोदींच्या आश्‍वासनांचा त्यांच्याच खासदारांना विसर

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 1:38AMपिंपरी : प्रतिनिधी

मागील लोकसभा निवडणूकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांच्या पक्षाच्या खासदारांना विसर पडला असला तरी भाजपची सर्व आश्वासने जनतेच्या लक्षात आहेत. असा टोला काँग्रेसचे  शहराध्यक्ष सचिन साठे यांनी हाणला आहे

पिंपरीत शनिवारी खा. अमर साबळे यांनी ‘मोदींनी प्रत्येक नागरीकांच्या खात्यात 15 लाख देऊ असे आश्वासन दिले नव्हते’ असे वक्तव्य केले त्याचा साठे यांनी समाचार घेतला आहे.  पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी खा.   साबळे यांनी पळ काढला. मात्र पंतप्रधान मोदींचे 15 लाखांबाबतचे आश्वासन व्हिडीओसह सोशल मिडीयात अद्यापही उपलब्ध आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर भाजपा सरकारने चार वर्षात एकही आश्वासन पुर्ण केलेले नाही. त्यामुळे पत्रकारांनी साबळे यांना विचारले असता मोदींनी प्रत्येक नागरीकांच्या खात्यात 15 लाख देऊ असे आश्वासन दिले नव्हते असे उत्तर त्यांनी दिले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मोदींच्या आश्वासनांबाबत प्रश्न विचारल्यावर तो ‘चुनावी जूमला’ होता असे उत्तर  देतात. तर पिंपरीत त्यांचेच खा. अमर साबळे हे मोदींसह शहांना देखील खोटे ठरवत दिशाभूल करणारे उत्तर देतात. केंद्रातील भाजपाचे हे सरकार त्यांचा कालावधी पूर्ण 
होईपर्यत जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण करणार नाही. 

उलट पत्रकारांना व जनतेलाच खोटे ठरवतील. मोदींची प्रतिमा जगभर ‘फसवा पंतप्रधान’ म्हणून तयार झाली असताना त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अशी वक्तव्य करुन त्याला दुजोरा देत आहे. अशा पंतप्रधानांना आणि भाजपाला पुढील वर्षात होणार्या  लोकसभा निवडणूकीत मतदार राजा घरी बसवल्या शिवाय राहणार नाही असे   साठे यांनी म्हटले आहे.