Thu, Jul 18, 2019 04:45होमपेज › Pune › बसच्या फेर्‍यांअभावी प्रवासी त्रस्त

बसच्या फेर्‍यांअभावी प्रवासी त्रस्त

Published On: Apr 25 2018 11:54PM | Last Updated: Apr 25 2018 11:43PMपिंपळे गुरव : प्रज्ञा दिवेकर

पिंपरी-चिंचवड  शहरात पीएमपीएमएल बसेसच्या फेर्‍यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबरोबरच अपुर्‍या मेटेंनन्समुळे जुन्या बसेस खराब झाल्याने पीएमपीएमएल प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्याबाबत शहरातील नागरिकांमधून संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या जात आहेत.पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे 1 हजार 460 बसेस रस्त्यावर धावत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात  764 परिवहन बसेस आहेत. त्यामधील 611 बसेस सध्या धावत आहेत. यामध्ये 80 टक्के बसेस चांगल्या अवस्थेत आहेत, तर 20 टक्केबसेस सध्या खराब अवस्थेत आहेत. पुणे परिवहन मंडळाच्या 1 हजार 200 बसेसपैकी 250 बसेस आणि भाडे कराराच्या 653 पैकी 200 बसेस ची दुरवस्था झाली आहे. एका बसचे आयुर्मान 12 वर्षांपर्यंत असून आठ लाख चाळीस हजार किलो मीटरपर्यंत बस धावते. पीएमपीएमएलच्या बसेस अपुर्‍या मेंटन्समुळे रस्त्यावरच बंद पडत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. 1200 बसेसपैकी 25 टक्केबसेस वाईट अवस्थेत आहेत. 

पीएमपीएमएलमध्ये चालक व वाहक यांच्या अनेक रिक्‍त जागा अद्यापही भरल्या नाहीत. अपुर्‍या कर्मचारी संख्येचा सध्याच्या कर्मचार्‍यांवर ताण पडत आहे. यामध्येच कर्मचारी वर्गाच्या  बदल्या, दहा वर्षांनी होणारी पगार वाढ, वैद्यकीय सुविधा आदींबाबत अनेक समस्यांना कर्मचार्‍यांना सामोरे जावे लागत आहे. बसची संख्या कमी झाली की, नाही याबाबत अधिकारी उडवाउडीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे बसेसच्या फेर्‍या वाढविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Tags : Pimpri, Migratory, passengers, suffer, bus, ferries