पिंपरी : प्रतिनिधी
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वल्लभनगर मेट्रो स्थानकाचे काम सुरू झाले आहे, त्याचे औपचारिक भूमीपूजन लवकरच होणार आहे. येत्या दि. २४ डिसेंबर रोजी ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या पुण्यात येत असून, त्यांच्याहस्ते भूमीपूजन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वल्लभनगर येथे पहिले स्थानक होणार आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा आणि जीओ टेक्निकल सर्व्हे सुरू झाला आहे. स्थानकाजवळ नवीन पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रीज) बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या मदतीने मेट्रो स्थानक दोन्ही बाजूच्या सर्व्हिस लेनला जोडण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकाच्या पादचारी पुलाचा वापर मेट्रोसह इतर पादचार्यांनाही करता येणार आहे. या मेट्रोे स्थानकाचे काम सुरू झाले आहे. त्याचे औपचारिक भूमीपूजन लवकरच होणार आहे.