होमपेज › Pune › ‘माळेगाव’बाबत सभासद निर्णय घेतील'

‘माळेगाव’बाबत सभासद निर्णय घेतील'

Last Updated: Feb 24 2020 1:27AM

बारामती नगरपरिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रात माळेगाव कारखान्यासाठी मतदानाचा हक्क बजावताना उपमुख्यमंत्री अजित पवारबारामती : पुढारी वृत्तसेवा

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासंदर्भात मला जी भूमिका मांडायची होती ती प्रचाराच्या सांगता सभेत मांडली आहे. रविवारी सकाळपासून मतदान सुरू झाले असून शांततेत मतदान होत आहे. माळेगावबाबत सूज्ञ सभासद त्यांच्या सदसदविवेक बुद्धीला स्मरूण योग्य तो निर्णय घेतील, असे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

माळेगावच्या निवडणुकीत मतदानासाठी पवार रविवारी (दि. २३) सकाळी मुंबईहून बारामतीला आले. त्यांनी येथील शारदा प्रांगणातील नगरपरिषद शाळेमध्ये ब वर्गातील मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

पवार यांचे बारकाईने लक्ष, मतदान केंद्रांना दिल्या भेटी

सोमवारी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असताना रविवारी माळेगाव कारखान्याच्या मतदानाच्या निमित्ताने पवार यांनी बारामती गाठली. ते स्वतः कारखान्याचे ब वर्गाचे मतदार आहेत. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी त्यांचे फोनवर बोलणे सुरू होते. विविध मतदान केंद्रावरील स्थिती ते जाणून घेत होते. मेडद गावातील मतदान केंद्रासह काही केंद्रांवर ना. पवार यांनी भेट दिली