Mon, Aug 26, 2019 01:30होमपेज › Pune › मध्य रेल्वे, मराठा लाईफ इन्फ्रन्ट्री उपांत्य फेरीत

मध्य रेल्वे, मराठा लाईफ इन्फ्रन्ट्री उपांत्य फेरीत

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 24 2018 10:34PMपुणे : प्रतिनिधी

महापौर चषक हॉकी स्पर्धेमध्ये मध्य रेल्वे, मराठा लाईफ इन्फ्रन्ट्री आणि इनकम टॅक्स या संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

म्हाळुंगे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा सुुर आहे. पहिल्या सामन्यात मध्य रेल्वे संघाने प्रियदर्शनी संघाचा 4-0 असा पराभव केला. मध्य रेल्वेच्या विनोद निंबोरे याने 2 -या मिनिटास गोल नोंदवला, भुषन ढेरे याने 19 व्या मिनिटास, शशिकांत बिरंजे याने 40, 59 व्या मिनिटास गोल केले.

दुस-या सामन्यात मराठा लाईफ इन्फ्रन्ट्री संघाने नांदेड इलेव्हन संघाचा 7-2 असा पराभव केला. मराठा लाईफ इन्फ्रन्ट्रीच्या गणेश पाटील याने 2,43 व्या मिनिटास, आकाश पाटील याने 4, 48 व्या मिनिटास, निलेश वाडकर याने 9 व्या मिनिटास, कृष्णा पाटील 12, 52 व्या मिनिटास गोल केले. तर, नांदेड इलेव्हनच्या करंजीत सिंघा याने 42 व्या मिनिटास गोल केला.  प्रविण पी याने 45 व्या मिनिटास गोल केला.

तिस-या सामन्यात क्रीडा प्रबोधनी संघाने हॉकी युनायटेड संघाचा 6-1 असा पराभव केला. हॉकी युनायटेड संघाच्या धरम पाल याने सामन्याच्या 22 व्या मिनिटास गोल केला.  क्रीडा प्रबोधनी संघाच्या तालीब शेख याने 24, 45, 49 व्या मिनिटास गोल केले. परमेश्वर पोटो याने 33, 40 व्या मिनिटास, अनिकेत गुरव याने 52 व्या मिनिटास गोल केला. चौथ्या सामन्यात इनकम टॅक्स संघाने कोल्हापुर इलेव्हन संघाचा शुटआउटमध्ये 6-5 असा पराभव केला. 

निर्धारीत वेळेत दोन्ही संघांची 2-2 अशी बरोबरी झाली. इनकम ट्रक्सच्या आशिष शेट्टी याने 2 -या मिनिटास, आषितोष लिंगेश याने 7 व्या मिनिटास गोल केले. तर, कोल्हापुर संघाच्या मुकुंद राजपुत याने 24 व्या , तर, रोहित रेडके याने 53 व्या मिनिटास गोल केला. पेनल्टी शुटआऊटमध्ये इनकम टॅक्सच्या विक्रम सिंग, राहुल सॅन्डर, आषितोष लिंगेश, नितीन कुमार याने गोल केले. तर, कोल्हापुरच्या मुकुंद राजपुत, संदीप सावंत आणि मयुर शिंदे यांनी गोल केला.