महापौर, उपमहापौरांची उद्या निवड

Last Updated: Nov 21 2019 1:49AM
Responsive image


पिंपरी : प्रतिनिधी 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि.22) सकाळी अकरा वाजता विशेष सभा होणार आहे. या सभेत औद्योगिकनगरीस ‘माई’च्या रूपात नवे महापौर मिळणार आहेत, महापौरपद हे सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपकडून सांगवीच्या ज्येष्ठ नगरसेविका उषा ऊर्फ माई ढोरे यांचा अर्ज दाखल झाला आहे. तर, उपमहापौरपदासाठी क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे यांचा एकमेव अर्ज आहे. पालिकेत भाजपचे 77 आणि संलग्न अपक्ष 5 असे एकूण 82 संख्याबळ आहे. त्यानुसार भाजपचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे.

विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदासाठी दापोडीच्या ज्येष्ठ नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे आणि उपमहापौरपदासाठी दापोडीचे नगरसेवक राजू बनसोडे यांनी अर्ज दाखल केला आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ 36 आहे. शिवसेनेचे 9 आणि मनसेचे 1 नगरसेवक आहेत. या तिन्ही विरोधकांनी एकत्रित मूठ बांधल्यास 46 इतकी संख्या होते. ही संख्या विजयासाठी पुरेशी नाही. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी शिवसेना व मनसे काय भूमिका घेते, यावरही बरचे काही अवलंबून आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले  भाजपाचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करतील, असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यात किती तथ्य आहे, हे उद्या स्पष्ट होणार आहे. तर, भाजप नेत्यांनी आमचा एकाही नगरसेवक फुटणार नाही, असा दावा केला आहे.

निवडणुकीचे चित्रीकरण
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्या अध्यक्षस्थानी सकाळी अकराला विशेष सभा सुरू होणार आहे. प्रथम महापौरपदाची निवडणूक होईल. अर्ज माघारीसाठी 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल. अर्ज माघारी घेतल्यास बिनविरोध निवड जाहीर केली जाईल. अर्ज माघारी न घेतल्यास हातवर करून मतदान घेतले जाईल. त्यानंतर उपमहापौरपदाची याच रितीने निवडणूक होणार आहे. या निवडणूक प्रकियेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे, असे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले. दरम्यान, गैरहजर राहणार्‍या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. प्रसंगी नगरसेवकपद धोक्यात येऊ शकते. सभेला उपस्थित राहून आपल्या पक्षाच्या उमेदवारांला मतदान करण्याचा व्हीप प्रत्येक पक्षाने बजावला आहे. 









#CAB विरोधात आगडोंब सुरुच; ईशान्येकडील आंदोलन दिल्लीत पोहोचले


रामलीला मैदानावर 'भारत बचाओ रॅली'च्‍या माध्‍यमातून काँग्रेसचा हल्‍लाबोल


पती-पत्‍नीचा एकमेकांना घातला कांदा लसणाचा हार!


संयुक्त राष्ट्र संघटनेची नागरिकत्व दुरुस्ती विधेयकायवर कोणती भूमिका?


नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यात लागू करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना कोणी केली?


टीम इंडियाला विंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी मोठा धक्का


राजधानी दिल्लीत पुन्हा भीषण आग 


तर ‘राज्य विरुद्ध केंद्र’ संघर्ष उभा राहील; शिवसेनेकडून पीएम मोदींवर 'वाग्बाण' सुरुच! 


नाशकात अल्पवयीन प्रेमीयुगुलाची आत्महत्या


महंत नामदेवशास्त्रीं स्वतः धनंजय मुंडेंच्या भेटीला; दिले 'स्पेशल' निमंत्रण!