Fri, Mar 22, 2019 01:29
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › मावळात भाजप, राष्ट्रवादी ‘फिफ्टी फिफ्टी’

मावळात भाजप, राष्ट्रवादी ‘फिफ्टी फिफ्टी’

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:03AM

बुकमार्क करा
वडगाव मावळ : वार्ताहर 

मावळ तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपने साळुंबे्र व उढेवाडीमध्ये तर राष्ट्रवादीने बेबडओहोळ व आढले बु. ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता काबीज केली असून, या दोन्ही प्रमुख पक्षांनी 5 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळाल्याचा दावा केला आहे. 

तालुक्यातील आंबळे, साळूंब्रे, बेबडओहोळ, आढले बु., डोणे,  मळवंडी ढोरे, शिळींब या 7 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्य निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया मंगळवारी (दि.26) पार पडली, तर उढेवाडीची निवडणूक यापूर्वीच पूर्णपणे बिनविरोध झाली आहे. बुधवारी (दि.27) सकाळी वडगाव येथील महसूल भवनात तहसिलदार रणजीत देसाई, नायब तहसिलदार सुनंदा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

निवडणूक निकालानंतर आमदार संजय भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी बिनविरोध झालेल्या उढेवाडी ग्रामपंचायीसह साळुंब्रे, डोणे, शिळींब, मळवंडी ढोरे या 5 ग्रामपंचायतींवर वर्चस्व असल्याचा दावा केला; तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे यांनीही बेबडओहोळ, आढले बु., मळवंडी ढोरे, शिळींब, डोने या 5 ग्रामपंचायतींवर वर्चस्वाचा  दावा केला आहे.

दरम्यान, दोन्ही पक्षांनी दावा केला असला तरी बेबडओहोळ व आढले बु. येथे  राष्ट्रवादीने व साळुंब्रे, उढेवाडी येथे भाजपने सरपंच पदासह एकहाती सत्ता काबीज केली आहे. आंबळे व शिळींबमध्ये सरपंचपद राष्ट्रवादीकडे तर बहुमत भाजपकडे, डोणे येथे सरपंचपद भाजपकडे व बहुमत भाजपकडे आहे; तसेच मळवंडी ढोरे येथे राष्ट्रवादीची जुनी फळी व भाजपने युती करुन निवडणूक लढवली असून त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या युवा फळीने स्वतंत्र पॅनेल करुन निवडणूक लढवली व सरपंचपदासह बहुमत पटकावले असल्याचा दावा रघुनाथ ढोरे, कैलास ढोरे, संतोष मो.ढोरे, अंकुश ढोरे यांनी दै.पुढारी शी बोलताना केला. 

मावळ तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या आठ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीला समसमान यश मिळाल्याचे दिसते; परंतु बेबडओहोळ, आंबळे व आढले बु. या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये मात्र भाजपला हार पत्करावी लागली असून, साळुंबे्रमध्ये राष्ट्रवादीला हार पत्करावी लागली आहे. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी वडगाव शहरामध्ये विजयी मिरवणुका, गुलाल व भंडार्‍याची उधळण करत बुधवारी आनंदोत्सव साजरा केला. पोलिस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ग्रामपंचायत व प्रभागनिहाय बिनविरोध व विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे : बेबडओहोळ -  प्रभाग 1 : कमल रोहिदास गराडे(बिनविरोध), जालिंदर गराडे (190 मते), लता गायकवाड (236 मते), प्रभाग 2 : तुषार बारमुख (बिनविरोध), नम्रता घारे (392 मते), प्रभाग 3 : सेवक घारे (295 मते), मनीषा घारे(308 मते), भीमा अढाळगे (306 मते),प्रभाग 4 : बाळू ठाकर व संध्या शिंदे(दोघे बिनविरोध), कविता ढमाले (227 मते).

साळुंब्रे - प्रभाग 1 : सुहास विधाटे (227 मते), द्वारका राक्षे (221 मते),  प्रभाग 2 : सगुणा राक्षे (118 मते), नलिनी विधाटे (150 मते),  प्रभाग 3 : वर्षा राक्षे, अजय दवणे (दोघे बिनविरोध), समीर थोरवे(234 मते)

आंबळे - प्रभाग 1 : वर्षा शरद पवार, संदिप गोविंद गायकवाड, सुरेखा संजय नखाते (सर्व बिनविरोध), प्रभाग 2 : रामदास शेटे (375 मते), अंजनाबाई पिलाणे(266 मते), नवनाथ मोढवे(299 मते), प्रभाग 3 : पुनम हांडे (383 मते), नवनाथ आंभोरे(358 मते), कमल चतूर(362 मते).

मळवंडी ढोर- - प्रभाग 1 : नवनाथ शिंदे(नामाप्र स्त्री), सुवर्णा सुनिल ढोरे(दोघी बिनविरोध), प्रभाग 2 : सविता ढोरे(118 मते), शंकर ढोरे(109 मते), प्रभाग 3 :संदिप खरात(166 मते), अनिता ढोरे, सावित्राबाई मोरे(दोघी बिनविरोध)

आढले बु॥ -  प्रभाग 1 : संगिता सावंत(334 मते), जालिंदर म्हस्के(332 मते), प्रताप घोटकुले(315 मते), प्रभाग 2 : अश्‍विनी सपकाळ(256 मते), सुनिता सावळे(263 मते), नितीन घोटकुले(252 मते), प्रभाग 3 : सुमन घोटकुले(162 मते), नितेश वाघमारे(170 मते), नंदिनी कटके(164 मते).

डोणे - प्रभाग 1 : सुलभा वाडेकर(141 मते), नामदेव सुतार(144 मते), प्रभाग 2 : श्रीरंग खिलारी(132 मते),मनिषा सुतार(125 मते), प्रभाग 3 : पुनम वाघमारे(198 मते), कुंदा घारे(196 मते), प्रसाद घारे(209 मते).

शिळींब - प्रभाग 1 : लिलाधर धनवे(306 मते), पुनक दरेकर(335 मते), प्रभाग 2 : धोंडाबाई घोगरे(208 मते), भाऊ आखाडे(195 मते), प्रभाग 3 : यशवंत शिंदे(216 मते), सुभद्रा कडू(221 मते), सिताबाई धनवे(बिनविरोध).