Tue, Mar 19, 2019 05:52होमपेज › Pune › पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Published On: Jul 04 2018 8:31PM | Last Updated: Jul 04 2018 8:30PMपुणे प्रतिनिधी 

खराडी येथील केडीया स्पा हेवन या मसाज पार्लरमध्ये चालणार्‍या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या मसाज सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी 3 मुलींची सुटका केली. तर त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणार्‍या स्पा मालकाला अटक केली आहे. 

सोमनाथ बनवारीलाल केडीया (45, कोरेगाव पार्क) असे अटक केलेल्या स्पा मालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील एरीसा एव्हेन्यू येथील पहिल्या मजल्यावर असलेल्या ’केडीया स्पा हेवन’ या मसाज पार्लरमध्ये सोमनाथ केडीया हा मसाज थेरेपीस्ट म्हणून ठेवलेल्या मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतो. अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस नाईक तुषार आल्हाट यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यावरुन सामाजिक सुरक्षा विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांचे कर्मचारी व चंदननगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथून नागालॅन्ड येथील 1 व महाराष्ट्रातील 2 सज्ञान मुलींची सुटका करण्यात आली. तेथून 1 मोबाईल इतर कागदपत्रे असा 19 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर सोमनाथ केडीया याला अटक करण्यात आली. पीडित मुलींची रवानगी महंमदवाडी रेस्न्यू फाऊंडेशन येथे करण्यात आली आहे. 

ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, अनिता खेडकर,  कर्मचारी तुषार आल्हाट, राजाराम घोगरे, नितीन लोंढे, महिला कर्मचारी ननिता येळे, सुप्रिया शेवाळे, अनुराधा ठोंबरे, रुपाली चांदगुडे व चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मुळीक व त्यांच्या पथकाने केली.