Fri, May 24, 2019 08:26होमपेज › Pune › महिलांसाठी विवाहाच्या प्रमाणपत्राची अट शिथिल

महिलांसाठी विवाहाच्या प्रमाणपत्राची अट शिथिल

Published On: Mar 20 2018 2:06AM | Last Updated: Mar 20 2018 12:42AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी अर्जदाराकडून विवाह प्रमाणपत्राची अट सक्तीची असल्याने अनेकांचे अर्ज बाद करण्यात आले होते. महिलांची ही अडचण लक्षात घेऊन अर्जदाराकडून विवाह प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना वाहन उद्योग करण्यासाठी पालिका प्रोत्साहन देते. या योजनेस शहरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल 5 हजारांपेक्षा अधिक अर्ज या योजनेसाठी प्राप्त झाले आहेत. मात्र, अर्जासोबत विवाह प्रमाणपत्र सक्तीचे केल्याने अनेक अर्ज बाद झाले होते. 

केवळ त्या एका कागदपत्रामुळे महिला वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणापासून  वंचित राहू नये म्हणून विवाह प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहेत. त्याऐवजी पॅन कार्ड इतर कागदपत्र अर्जांसोबत देता येतील, अशी उपसूचना समितीने मंजूर केली आहे. या निर्णयामुळे विवाह प्रमाणपत्रामुळे अर्ज बाद झालेल्या महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Tags : Pimpri, Pimpri News, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Women driving training, Marriage certificate,