होमपेज › Pune › मराठी भाषणाने उपराष्ट्रपतींनी जिंकली मने...

मराठी भाषा नितांत सुंदर : व्यंकय्या नायडू 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

"सर्वांना माझा नमस्कार...

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या नवव्या पदवीप्रदान समारंभास उपस्थित राहता आले, याचा मला आनंद होत आहे. पदवीधर विद्यार्थ्याचे  अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा... "एरवी दाक्षिणात्य 'टोन'मध्ये हिंदी, इंग्रजी बोलणाऱ्या उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी खास मराठीतून भाषणाला सुरुवात  करत उपस्थितांची मने जिंकली. तर, विद्यार्थ्यानी नायडू यांच्या भाषणास टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या ९व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

यावेळी उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, मराठी भाषा ही नितांत सुंदर आहे. 'ग्रेट' आहे.  तिचा अभिमान बाळगा, ती अधिकाधिक सुंदर करा असे सांगत उपराष्ट्रपतींनी उपस्थितांची मने जिंकली.

उपराष्ट्रपतींच्या या भाषणातील काही ठळक मुद्दे-

- पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना डी. लीट मिळाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या पुढारी वृत्तपत्राने केलेली सामाजिक कामे गौरवास्पद आहेत.

Image may contain: 2 people, people standing and flower
- 'पुढारी' हे केवळ वृत्तपत्रच नव्हे तर सामाजिक चळवळींचा 'पुढारी' आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकचळवळ उभी करत 'पुढारी'ने पथदर्शी काम केले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशिक्षण करून चांगले आणि जबाबदार नागरिक घडविले आहेत. आपल्या सामाजिक कामांतून 'पुढारी' एक दीपस्तंभ बनला आहे. 

Image may contain: 5 people, people standing
- करिअरमधील प्रगतीसाठी परदेशात जाण्यात काहीच  चुकीचे नाही. तिथे जाऊन भरपूर शिका, अर्थाजन करा  मात्र मातृभूमीची सेवा करण्यासाठी देशात परत या.
- आपला देश, आपली मातृभाषा आपले जन्मस्थान यांचा विसर कधीही पडू देऊ नका. तुम्ही कितीही मोठ्या पदव्या घेतल्या तरी देशाबाबतचे आणि समाजाबाबतचे उत्तरदायित्व तुम्हाला नजरेआड करून चालणार नाही.

- सर्व धर्मसमभाव,  विविधेतून एकता, 'वसुधैव कुटुंबकम् ' ही भारतीय संस्कृती आहे. हे आम्हा भारतीयांच्या रक्तातच आहे. ही संस्कृती आपण जोपासली पाहिजे.

Image may contain: 6 people, people smiling, people standing, crowd, wedding and outdoor
- आपल्या देशात विविध धर्मातील तसेच विविध भाषा बोलणारे लोक राहतात. परंतु या विविधतेतच एकता असल्याचे दिसून येते.
- आपली मातृभाषा, मातृभूमी, संस्कृती, परंपरा ही अत्यंत समृद्ध आहे, आपल्याला त्याचा अभिमान वाटायला हवा. आपण नेहमी मातृभूमीचा सन्मान करायला हवा.
- नाविन्याचे स्वागत करणे ही भारतीय परंपरा आहे.
- देशाचा विकास हेच तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे.
- कमी कालावधीत डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठने वैभवशाली कारकीर्द उभी केली आहे.
- देशाच्या लोकसंख्येत ५० टक्के असलेल्या महिलांचे सक्षमीकरण करणे आपले कर्तव्य आहे.
- आपल्याकडे विद्येचे प्रतिक म्हणून सरस्वती, संरक्षणाचे प्रतीक म्हणून पार्वती तर धनाचे प्रतीक म्हणून लक्ष्मीकडे पहिले जाते. तसेच नर्मदा, गोदावरी आदी नद्यांची नावेदेखील स्त्रियांच्या नावावरून दिलेली आहेत. कारण आपली संस्कृती स्त्रियांचा आदर करणारी आहे. परंतु देशातील 'निर्भया'सारखी प्रकरणे आपल्यासमोरील एक आव्हान आहे.
- भारत धार्मिकतेसाठी जगभरात ओळखला जातो. ही धार्मिकता माणसांमध्ये प्रेमाची भावना निर्माण करते, जगण्याला बळ देते, आव्हाने पेलण्यासाठी आत्मविश्वास देते.
- 'आयटी' आणि 'बीटी' या दोन्हींचा संगम देशाला प्रगतीपथावर घेऊन जाईल. 
- उच्च शिक्षण देणार्‍या संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, प्रामाणिकपणा, सामाजिक जबाबदारीचे भान, शिस्त, सहवेदना, महिलांविषयी आदर, अनेकतावादाबाबत आग्रही असणे इत्यादी मूल्ये रुजवण्याची गरज आहे.
- समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी सर्जनशील पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. आपल्या पूर्वजांचे अंधानुकरण करुन चालणार नाही. यश मिळवण्यासाठी आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी मोठी स्वप्ने पहायला शिकले पाहिजे.
- जगात ज्ञानापेक्षा कल्पनेला अधिक महत्व आहे, हे आईन्स्टाईनने जाणले होते. ज्ञान हे सिमित आहे पण, कल्पनेचे विश्‍व अमर्याद आहे. सध्याच्या युगात डिजिटल क्रांतीमुळे अमूलाग्र बदल होत आहे. तंत्रज्ञानाने जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये संपूर्ण बदल घडवून आणला आहे. तंत्रज्ञानाने होणाऱ्या बदलाच्या वेगाशी आपण जुळवून घेतले पाहिजे.
- आपल्या संस्कृतीचा गाभा, परंपरा, वारसा आणि इतिहास यांची मूल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. त्याचबरोबर आपण निसर्गाचा आदर आणि संवर्धन केले पाहिजे.
- तरुण पिढी 'गुगल'ला देव मानते, पण गुरुपेक्षा कोणीही श्रेष्ठ असू शकत नाही.
- ब्रिटिशांच्या वसाहतवादी मानसिकतेतून आपण बाहेर पडले पाहिजे. इंग्रजी जरूर शिकले पाहिजे परंतु घरामध्ये मातृभाषेतच बोलले पाहिजे.


  •