Sat, Nov 17, 2018 07:54होमपेज › Pune › मराठा तरूणांनो व्यवसायात उतरा : छत्रपती संभाजीराजे 

मराठा तरूणांनो व्यवसायात उतरा : छत्रपती संभाजीराजे 

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 1:24AMपुणे : प्रतिनिधी

मराठा तरूणांनी व्यवसायात उतरावे. त्यांच्या व्यवसायाच्या जाहीरातीसाठी आणि अनेक ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी  ‘मराठा डायल’ ही डिरेक्टरी निश्‍चितच उपयोगी पडेल, असे मत  राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.  सातारा रोडवरील आण्णाभाउ साठे सभागृहात ‘मराठाडायल’ डिरेक्टरीच्या उदघाटन खा. संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाव्हणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, प्रवीण गायकवाड, संजीव भोर, अमोल काटे, संदीपदादा मोहीते व इतर मान्यवर उपस्थित होते.

मराठाडायल डॉट कॉम ही मराठा व्यावसायिकांची डिरेक्टरी आहे. मराठा डायल वर हजारो मराठा व्यावसायिकांचे व्यवसाय नोंदणी केलेले आहेत. या डिरेक्टररीमध्ये हवी ती सेवा आणि हवे ते मराठा व्यावसायिक शोधू शकता. सर्व मराठा लोकांनी फक्त मराठा व्यावसायिकांकडूनच सेवा घ्यावी असे यामागील ध्येय आहे. 

यावेळी अनेक मान्यवरांनी मराठी माणुस कसा व्यवसाय करून शकतो याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे म्हणाले की मराठा समाजाने केवळ ‘रिअ‍ॅक्टिव्ह’ न होता ‘अ‍ॅक्टिव्ह’ व्हावे. नुसता इतिहास नाही तर भविष्यही घडवायला हवे.