Tue, Jun 18, 2019 22:27होमपेज › Pune › मराठा आरक्षण; आज पुण्यात बैठक

मराठा आरक्षण; आज पुण्यात बैठक

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी  

मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक, येत्या शुक्रवारी (दि. 29) विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सकाळी 11 आयोजित करण्यात आली आहे.

आयोगाचे अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. बैठकीत तज्ज्ञ सदस्य सर्जेराव निमसे, सदस्य दत्तात्रय बाळसराफ, चंद्रशेखर देशपांडे, प्रमोद येवले, रोहिदास जाधव, सुधीर ठाकरे, सुवर्णा रावळ, राजाभाऊ करपे, भूषण कर्डिले, तसेच सदस्य सचिव डी. डी. देशमुख तसेच आयोगाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत.

या बैठकीत व्यक्ती व संघटना यांच्याकडून माहिती घेण्यात येईल. तसेच त्यांचे म्हणणे ऐकणे व निवेदने स्विकारून, माहिती संकलित केली जाणार आहे. पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रातील ज्या व्यक्ती, संस्था व संघटना यांना मराठा समाजाच्या मागासलेपणासंबंधी निवेदन सादर करावयाचे आहे, किंवा म्हणणे मांडावयाचे आहे, त्यांनी लेखी पुरावा व ऐतिहासिक दस्तऐवज किंवा माहितीसह सभागृहात जनसुनावणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोगाच्या संशोधन अधिकार्‍यांंनी केले आहे.