Tue, Jul 16, 2019 13:34होमपेज › Pune › मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने लढा द्यावा : रामदास आठवले 

मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने लढा द्यावा : रामदास आठवले 

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 12:49AMपुणे : प्रतिनिधी  

मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने  आंदोलनाचा लढा उभारावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची सुरुवातीपासून भूमिका आहे. राज्य सरकारकडून 16 टक्के आरक्षणाची मागणी न्यायालयामध्ये  टिकेल की नाही, हे सांगता येणार नाही. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत आरक्षण कसे बसवता येईल, त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून कायदा करावा लागणार आहे. मराठा आरक्षणाला सर्व राजकीय पक्षाचा पाठींबा आवश्यक आहे. तसेच ओबीसी, एससी आणि एसटी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता. योग्य आरक्षण कसे देता येईल, यासाठी सरकार कडून प्रयत्न सुरू असल्यो रामदास आठवले यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक लढविणार

राज्यसभेचे खासदार असलेले रामदास आठवले हे वांद्रे पूर्व मधून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ते म्हणाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) राज्यात वातावरण पोषक असून, मागील निवडणुकीचा अंदाज लक्षात घेता, मुंबई मधून निवडणूक लढवणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.