Wed, Jan 23, 2019 11:41होमपेज › Pune › गजबजलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आज शुकशुकाट

गजबजलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आज शुकशुकाट

Published On: Aug 09 2018 12:01PM | Last Updated: Aug 09 2018 12:01PMपिंपरी : प्रतिनिधी 

आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या हाकेला पिंपरी चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला आहे. काही अनुचित प्रकार घडू यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात  करण्यात आला आहे.  

शहरातील मुख्य चौकात एरवी कायम मोठी गर्दी असते मात्र आज त्या ठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे. चिंचवड आणि थेरगाव येथील घाटांवर अग्निशमन दल आणि महापालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर तुरळक वाहने धावताना दिसून येत आहेत. हिंजवडीतील बहुतांश कंपन्यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच काही कंपन्यांनी महत्वाच्या कर्मचाऱ्यांना सकाळी नऊच्या आत कामावर बोलावण्यात आले आहे. आंदोलनाची धग संपल्यानंतर रात्री उशिरा या कर्मचाऱ्यांना सोडण्यात येणार असल्याचे हिंजवडी इंडस्ट्रियल असोशिएशनचे चरणजीत सिंग यांनी पुढारीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले हिंजवडीत तीन लाखांवर कर्मचारी दररोज दाखल होतात. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक कंपन्यांनी सुट्टी दिली आहे. तर काही कंपन्यांनी घरातूनच काम मुभा अभियंत्यांना दिली आहे. त्यामुळे कायम गजबजलेल्या आयटीनगरीत आज  शुकशुकाट आहे.