होमपेज › Pune › मराठा आरक्षण आंदोलन हाताळता आले नाही : धनंजय मुंडे

मराठा आरक्षण आंदोलन हाताळता आले नाही : धनंजय मुंडे

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 1:26AMपुणे : प्रतिनिधी

राज्यात सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरुवातीला परळी येथे सुरू झाले. त्याचवेळी आंदोलकांसोबत चर्चा करा, अशी मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर राज्यात सर्वत्र सुरू झालेले आंदोलन राज्य सरकारला हाताळता आले नाही , अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

‘हे थोरय फेसबुकी मित्रमंडळ’नी तिसरा वशोटोत्सव कर्वेनगर येथील दुधाने लॉन्समध्ये रविवारी आयोजित केला होता. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, नगरसेविका लक्ष्मीबाई दुधाने उपस्थित होते.

पुण्यात वशोटोत्सव साजरा करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून, ते आपल्या बनावट खात्यावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरेधात लिखाण करतात, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेत केला होता. आमच्या खर्‍या नावानेच लिहीत असतो, हे सांगण्यासाठी ‘हे थोरय फेसबुकी मित्रमंडळ’ने पुण्यात तिसरा वशोटोत्सव आयोजित केला होता.

मुंडे म्हणाले, अ मराठा आरक्षणाचा लढा पुढे गेला असून, मराठा मित्र-मैत्रिणी  आरक्षणासाठी आपले बलिदान देत आहेत, असे असताना सरकार गप्प का आहे? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला आहे. यापुढची लढाई ही सोशल मीडियाशिवाय लढता येणार नाही. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक मोहसीन शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सचिन कुंभार, शंभूराजे ढवळे, नितीन यादव, समीर शेख, शुभम बोराडे, आरिफ काझी, पैगंबर शेख यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले. फेसबुकवर सतत लिखान करणारे सुमारे एक हजार तरुण वशोटोत्सवामध्ये सहभागीझाले होते.