Tue, Feb 19, 2019 02:25होमपेज › Pune › अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या गाडीला अपघात

अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या गाडीला अपघात

Published On: May 14 2018 8:52AM | Last Updated: May 14 2018 10:14AM पुणे : पुढारी ऑऩलाईन

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील लोणावळ्याजवळ सोमवारी हा अपघात झाला असून यात प्रार्थनाच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचे समजते. तिला लोणावळ्याजवळील यश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 'मस्का' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रेरणा आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव मुंबईहून कोल्हापूरला येत असताना हा अपघात झाला. यावेळी गाडीमध्ये यादोघांसह चालक आणि  प्रेरणाची सहाय्यक स्मिता देखील होती. प्रेरणाला झालेली दुखापत गंभीर नसली तरी तिला काही दिवस विश्रांती घ्यावी लागू शकते.

अनिकेत, प्रार्थना आणि प्रार्थनाची मैत्रीण हे तिघेही कोल्हापूरला 'मस्का' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निघाले होते. आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर प्रार्थना बेहरे यांच्या फॉरचूनर या कारला भीषण अपघात झाला. हायवेवरील थांबलेल्या टेम्पोजवळून जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा चेंदामेंदा झाला. सुदैवानं या अपघातात तिघेही बचावले. प्रार्थनाच्या हाताला आणि डोक्याला जबर मार लागला असून तिला उपचारासाठी वलवन येथिल यश हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दरम्यान, 'हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. पुढे दरी होती. त्यामुळे आम्ही देवाच्या कृपेने थोडक्यात बचावलो,' असं अनिकेतने सांगितलं.