Mon, Jun 17, 2019 02:40होमपेज › Pune › डुकरांचा बंदोबस्त करा; अन्यथा आंदोलन

डुकरांचा बंदोबस्त करा; अन्यथा आंदोलन

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 10:13PMपौडरोड : वार्ताहर

कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये डुक्करांचे प्रमाण  मोठ्या प्रमाणावर  वाढलेले दिसत आहे. कोथरूडमधील वाढती लोकसंख्या व त्याबरोबर कचर्‍याची समस्या देखील मोठ्याप्रमाणात वाढत आहे.
कचर्‍यामुळे या परिसरात डुकरांचा  वावर वाढला आहे. यावर कोणतीही उपयोजना होत नसल्यामुळे डुक्करांचा बंदोबस्त करा.. नाहीतर आम्ही तुमचा बंदोबस्त करू, असा इशारा मनसे कडून  देण्यात आला आहे.  

याबाबत मनसे कोथरुड विभागाच्या वतीने कोथरुड क्षेत्रीय कार्यलयातील उपअभियंता प्रफुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी कोथरुड विभागाचे अध्यक्ष सुधीर धावडे, विनोद मोहिते, दीपक पायगुडे, रमेश उभे, बाळा शिंदे, सीताराम तोंडे पाटील, नितीन गायकवाड, राजेंद्र वेडेपाटील, अशोक कदम, हितेश कुंभार,राजेश गायकवाड यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.या परिसरातील कचरा वेळवर उचलला जात नाही. यामुळे डुकरांचा वावर या परिसरामध्ये वाढला आहे. प्रशासनाचा हरगर्जीपणामुळे  नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

या भागामध्ये उंचवस्ती, झोपडपट्टी, नाले, सोसायट्या परिसरात सर्रास डुकरांचे कळप फिरताना दिसत आहेत. आता अचानक ही डुकरे आली आहेत कि कसं काय? एवढी संख्या वाढेपर्यंत आपलं प्रशासन नक्की काय करत होते ? आणि आता या डुकरांमुळे रोगराई वाढण्याचा किंवा नागरिकांना त्रास होण्याची वाट पाहतंय का ? असा प्रश्‍न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. येता 4 दिवसात या संदर्भात प्रशासनाकडून योग्य ती कारवाई झालीतर  महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने याचा  बंदोबस्त  करेल असा इशारा देण्यात आला आहे.