Fri, Apr 19, 2019 12:02होमपेज › Pune › पुणे : नगरसेविका आणि पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या

पुणे : नगरसेविका आणि पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या 

Published On: May 28 2018 4:38PM | Last Updated: May 28 2018 4:42PM पिंपरी : प्रतिनिधी 
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या ‘नगरसेविका आणि पत्नी यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका टपरी धारकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील संत तुकारामनगरमध्ये रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला घडला . 

सचिन ढवळे (४४, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या टपरीधारकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन ढवळे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्या चिठ्ठीमध्ये स्थानिक नगरसेविका आणि पत्नीचे नाव लिहले आहे. सचिन ढवळे यांनी दोन व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. नक्की काय त्रास होता याचा उल्लेख नाही. पिंपरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केलेला आहे. काही जणांकडे चौकशी सुरु आहे. पिंपरी पोलिस कसून तपास करत आहेत. या प्रकरणी भाजपाच्या नगरसेविका सुजाता पालांडे, त्यांचे पती, मयत सचिन यांची पत्नी यांच्यासह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.