Wed, Nov 21, 2018 05:11होमपेज › Pune › पुणे:  प्रियकराकडून 50 वर्षीय प्रेयेसीचा निर्घृण खून

पुणे:  प्रियकराकडून 50 वर्षीय प्रेयेसीचा निर्घृण खून

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 पिंपरी : प्रतिनिधी

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास मोशीतील, नागेश्वर कॉलनी येथे हा प्रकार घडला असून बांधकाम व्यावसायिक प्रियकर पसार झाला आहे. शारदाबाई महेशभाई पटेल (५०, रा. नागेश्वर कॉलनी, मोशी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 

 याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक  महेशभाई रामजी पटेल (वय ५५) याच्याविरोधात भोसरी, एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हा शारदाबाईच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. शुक्रवारी रात्री पती महेश मद्यप्राशन करुन घरी आला. त्यानंतर दोघांमध्ये नेहमीप्रमाणे भांडणे सुरु झाली. महेश याने शारदाबाईच्या डोक्यात फावडा घालून निर्घृण खून केला आणि पसार झाला. सकाळी पटेल कुटुंबीयांच्या घराचा दरवाजा उशिरापर्यंत बंद होता. त्यामुळे शेजार्‍यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला असता शारदाबाई मृत अवस्थेत आढळून आल्या.

Tags : Crime, Murder, Woman, Bhosari,  Pimpari, Pune, Crime News In Pune


  •