Mon, Aug 19, 2019 15:20होमपेज › Pune › प्रामाणिक प्रवासी काडीपेटीसह विमानात; सुरक्षा चव्हाट्यावर

प्रवासी काडीपेटीसह विमानात; सुरक्षा चव्हाट्यावर

Published On: May 11 2018 8:19AM | Last Updated: May 11 2018 8:19AMपुणे : प्रतिनिधी

एक प्रवाशी लोहगाव विमानतळावरून नागपूरला पोचतो. त्यानंतर त्या प्रवाशाला आपल्या बॅगमध्ये काडीपेटी (माचिस बॉक्स) असल्याचे त्याच्या लक्षात येते. त्यामुळे लोहगाव विमानतळावर प्रवेश करताना केल्या जाणार्‍या तपासणीमध्ये त्रुटी असल्याचे स्पष्ट होत आहे. काडी पेटी बॅगमध्ये चुकून राहिल्याची कबुली संबंधित प्रवाशाने समाजमाध्यमावर दिली आहे.

या निमित्ताने पुणे शहरातील लोहगाव विमानतळ प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. पुणे शहर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते. पुणेकरांना हवाई वाहतूक सेवा देण्यासाठी संरक्षण विभागाचे लोहगाव येथील विमानतळ वापरले जाते. त्यामुळे या विमानतळात मुंगीही प्रवेश करु शकत नाही. मात्र, पुण्याहून नागपूरला जाणार्‍या एका प्रवाशाच्या बॅगमध्ये चुकून ज्वलनशील असलेली काडीपेटी राहिली होती. ही बाब नागपूरला जाताना प्रवासादरम्यान प्रवाशाच्याच निदर्शनास आली. त्यामुळे विमानतळ सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

यासंदर्भात लोहगाव विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.