Sat, Feb 23, 2019 16:16होमपेज › Pune › दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीला वरवंट्याने मारहाण

दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीला वरवंट्याने मारहाण

Published On: May 15 2018 1:19PM | Last Updated: May 15 2018 1:19PMवाकड : वार्ताहर 

दारू पिण्यास पैसे न दिल्याने मद्यपीने पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून तिला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवार (दि.१४) सायंकाळी चारच्या सुमारास वाकड येथे घडली. या प्रकरणी सुरेखा संतोष सुळके (३०, रा.वाकड ) या महिलेने पतीच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखाचा पती संतोष अंकुश कुदळे ( वय,३५) याला दारूचे व्यसन आहे. सुरेखा  धुणीभांडी करून घरखर्च भागवते. संतोष तिच्याकडे दारू पिण्यासाठी वारंवार पैशाचा तगादा लावतो. सोमवारी देखील संतोष दारू पिऊन आला व त्याने सुरेखाकडे आणखी दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. सुरेखाने पैसे देण्यास नकार दिल्यावर चिडलेल्या संतोषने तिच्या डोक्यात वरवंटा घालून तिला गंभीर जखमी केले. 

या घटनेनंतर जखमी सुरेखाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.