Thu, Jun 20, 2019 01:26होमपेज › Pune › पुणे : अल्पवयीन मुलीवर बळजरी करणाऱ्या नराधमाला अटक

पुणे : अल्पवयीन मुलीवर बळजरी करणाऱ्या नराधमाला अटक

Published On: Apr 17 2018 12:34PM | Last Updated: Apr 17 2018 12:41PMवाकड (पुणे) : पुढारी ऑनलाईन 

पुण्यात अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील वाकड परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास गजबजलेल्या  लोकवस्तीमध्ये हा प्रकार  घडला. आईसमोरच पीडित मुलीचा विनयभंग केल्याने या प्रकाराबाबत परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने रवी पाटोळे (वय,२१) याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम १८ नुसार गुन्हा नोंद केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी घरात झोपली असताना पाटोळेने दाराची कडी वाजवली. मुलीच्या आईने दार उघडताच पाटोळेने त्यांना ढकलून देत पीडित मुलगी झोपलेल्या ठिकाणी जाऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईने आरडाओरडा केल्याने शेजारी राहणारे नागरिक जमा झाले. पाटोळे हा पूर्वीपासून अल्पवयीन मुलीला त्रास देत असल्याचे मुलीच्या आईने सांगितल्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

Tags : Man Arrested, Minor Girl, Rape, Minor Girl Harassment, Crime, Pune, Wakad