Tue, Mar 26, 2019 21:52होमपेज › Pune › ‘माझी कन्या भाग्यश्री’चे १२० लाभार्थी

‘माझी कन्या भाग्यश्री’चे १२० लाभार्थी

Published On: Apr 14 2018 10:30AM | Last Updated: Apr 14 2018 12:05AMपुणे : प्रतिनिधी

राज्यात  मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास सेवा योजनेनुसार माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजनेला गती दिली आहे. त्यानुसार एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणार्‍यास 50 हजार रुपये आणि दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास 25 हजारांचे अनुदान लाभार्थींच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या 120 लाभार्थींना अनुदान दिले जाणार आहे.  

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने 2017-18 मध्ये 120 लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन मुलींच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थींची संख्या 114 आहे. तर एका मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबाची संख्या 6 आहे. संबंधित 114 कुटुंबियांना प्रत्येकी 25 हजार आणि सहा कुटुंबियांना 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी 31 लाख 50 हजार वितरित केले जाणार आहेत. दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबाची सर्वाधिक  संख्या 32 जुन्नरमध्ये आहे. 

शासनाच्या नवीन धोरणानुसार माझी कन्या भाग्यश्री योजनेत एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास 50 हजार तर दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन केल्यास 25 हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील 120 लाभार्थांच्या खात्यावर अल्पावधीतच अनुदानाचे वितरण केले जाणार आहे. - दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण
 

Tags : pune, pune news, Majhi Kanya Bhagyashree, beneficiaries,