Mon, Nov 19, 2018 14:57होमपेज › Pune › महेश कोळी आत्महत्येप्रकरणी बँक रोखपालास अटक करा

महेश कोळी आत्महत्येप्रकरणी बँक रोखपालास अटक करा

Published On: Feb 02 2018 11:54AM | Last Updated: Feb 02 2018 11:53AMबारामती : प्रतिनिधी  

बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील  महाविद्यालयीन विद्यार्थी महेश भानुदास कोळी याच्या आत्महत्येप्रकरणी जिल्हा बॅंकेतील रोखपालास त्वरित अटक करावी या मागणीसाठी बारामती - इंदापूर रस्त्यावर काटेवाडी येथे आज (शुक्रवारी) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महेश याने बुधवारी (31 जानेवारी) राहत्या घरी गळफास घेउन केली आत्महत्या केली होती. 

महेश कोळी हा आपल्या आजीसोबत काल जिल्हा बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या नजरचुकीने जादा पैसे दिले गेल्याचा दावा करण्यात आला होता. सीसीटिव्ही फुटेजवरुन हे पैसे महेश याला दिल्याचे दिसत आहे. मात्र ते आपल्याला मिळाले नसल्याचे महेशचे म्हणणे होते. त्यातूनच त्याने बुधवारी राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणात बँक कर्मचारी यांच्यावर  बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही संबंधितास अटक करण्यात आली नसल्याने त्यास त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी बारामती - इंदापूर रस्त्यावर  रास्ता रोको करण्यात आला.