Fri, Sep 21, 2018 21:36होमपेज › Pune › पुणे : महावितरणचा सहायक अभियंता लाच लूचपतच्या जाळ्यात

पुणे : महावितरणचा सहायक अभियंता लाच लूचपतच्या जाळ्यात

Published On: Dec 19 2017 4:46PM | Last Updated: Dec 19 2017 4:44PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

हवेली तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या आंबेगाव शाखा येथील सहायक अभियंत्याला ५० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पुणे एसीबीने मंगळवारी दुपारी ही कारवाई केली.

प्रमोद वसंतराव चिंदे असे रंगेहात पकडण्यात आलेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

तक्रारदराने एसीबीकडे तक्रार दिली आहे. त्यानी नवीन १३ फ्लॅटसाठी वीज मीटर बसविण्यासाठी अर्ज केला होता. हे वीज मीटर बसवून देण्यासाठी लाच घेतली.