Sun, Mar 24, 2019 04:33होमपेज › Pune › आर्थिक निकषावर आरक्षण द्या : राज ठाकरे

आर्थिक निकषावर आरक्षण द्या : राज ठाकरे

Published On: Jul 27 2018 1:34PM | Last Updated: Jul 27 2018 1:34PMपुणे : पुढारी ऑनलाईल

सरकार फक्‍त लोकांच्या भावनांशी खेळत आहे. प्रत्‍येकजण एकमेकांकडे जातीय नजरेतून पाहतोय. तसेच जातीय आरक्षणामुळे राज्‍यात एकमेकांविरोधात द्वेष पसरतोय. त्‍यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण दिले तर सर्व प्रश्न सुटतील. असे मत महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्‍त केले.  

पुण्यात मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्‍या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्‍यांनी शिवसेनेसह भाजवर जोरदार टीका केली. राज ठाकरे म्‍हणाले, ‘‘सरकारी क्षेत्रात संधीच नाहीत तर आरक्षणाचा उपयोग काय? सरकार संस्‍थांचं खासगीकरण करण्याचा प्रयत्‍न करत आहे. महाराष्‍ट्र बिहार करयाचा आहे काय? हे फक्‍त मतांसाठी राजकारण सुरु आहे. स्‍थानिक मुलांना जास्‍तीत जास्‍त नोकऱ्या दिल्‍या तर आरक्षणाची गरच भासणार नाही. राज्‍यातील नोकऱ्या परप्रांतीय बळकावत आहेत.’’

आपला संताप व्यक्‍त करत राज यांनी, भाजपने कुठे नेहून ठेवलाय महाराष्‍ट्र माझा? असा प्रश्न उपस्‍थित केला. प्रत्‍येक जातीचा माणूस स्‍वराज्‍याठी लढला आहे. महाराष्‍ट्राचं प्रबोधन करण्याची गरज का यावी? असा प्रश्न उपस्‍थित करत काकासाहेब शिंदे याचा हाकणाक जीव गेला. पून्हा काकासाहेब शिंदे होता कामा नये, असेही राज ठाकरे म्‍हणाले.  

राज्यात यापूर्वी सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकामधील नेते आणि त्यावेळी विरोधात असलेले राजकीय पक्ष नेते मराठा आरक्षणाबाबत एका व्यासपीठावर आले होते, त्यावेळी आरक्षण देनार म्हणाले होते, पण त्याबाबत पूढे काय झाले? असा प्रश्न राज यांनी यावेळी विचारला.