Sun, Apr 21, 2019 13:46होमपेज › Pune › बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

Published On: May 29 2018 3:33PM | Last Updated: May 29 2018 3:33PMपुणे, (प्रतिनिधी)- 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (30 मे) दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे. बारावीच्या निकालासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगत होती. त्यानंतर अखेर बारावीच्या निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. राज्यातून जवळपास  15 लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते.  

निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासंदर्भातील अर्जाचा नमुना बोर्डाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. स्वयंसाक्षांकित गुणपत्रिकेच्या प्रतिसह विद्यार्थ्यांनी 31 मे ते 9 जून या कालावधीत अर्ज व शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे सादर करणे आवश्यक आहे.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी आधी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्‍यक आहे. छायाप्रतीसाठी 31 मे ते 19 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. बीएसएनएलवर निकाल मिळविण्यासाठी MHHSC जागा सोडून बैठक क्रमांक लिहून 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे. उदा . MHHSC (Space) Seat no  Send 57766 याशिवाय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.