Tue, Apr 23, 2019 09:38होमपेज › Pune › जम्मू-काश्मीर प्रमाणे महाराष्ट्र सरकार कोसळेल: प्रकाश आंबेडकर(व्हिडिओ) 

जम्मू-काश्मीर प्रमाणे महाराष्ट्र सरकार कोसळेल: प्रकाश आंबेडकर(व्हिडिओ) 

Published On: Jun 20 2018 1:56PM | Last Updated: Jun 20 2018 2:16PMपुणे: पुढारी ऑनलाईन

जम्मू-काश्मीरमध्ये ज्या प्रमाणे सरकार कोसळले तशीच स्थिती महाराष्ट्रात होण्याची चिन्हे आहेत असे सांगत आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी या बॅनरखाली निवडणूक लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आंबेडकरांनी राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राज्यातील पुरोगामी विचारांच्या पक्षांनी आमच्यासोबत यावे. आमचे दरवाजे मोकळे आहेत. ज्या पक्षांना आमच्या अटी मान्य असतील आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, असे आंबेडकर म्हणाले. राज्यात धनगर आणि भटक्या जमातींची वंचित बहुजन आघाडीची स्थापना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याद्वारे वंचित समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी याकरीता त्यांना उमेदवारी दिले जाईल. तसेच जे वेगवेगळे घटक विभक्तपणाचा फायदा घेत आहेत. तो थांबविण्यासाठी या आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार केले जाणार आहे. राज्यात लवकरच शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी परिषद आयोजित करणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून चॉईस ऑफ एज्युकेशनच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

पवारांसोबत जाणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना आम्ही प्रतिगामी मानत नाही. मात्र त्यांनी बरीच पावले प्रतिगामी उचलली आहेत. पेशवाईला आमचा विरोधच आहे. पवारांनी फुले पगडी स्विकारली याचा आनंदच असल्याचे आंबेडकर म्हणाले. पवार हे पुरोगामी आहेत पण मधेच ते दुसऱ्या वाटेने जातात, त्यामुळे जोपर्यंत त्यांच्याकडून प्रस्ताव येत नाही तो पर्यंत आम्ही काही बोलणार नाही. 

मारेकरी सत्ताधारी पक्षाच्या जवळचे

स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पोलिसांनी गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांना अटक केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. मारणारे कोण आहेत हे पोलिसांना चांगले माहीत आहेत. यामागे कोण आहेत, गोळी कोणी चालवली याची माहिती पोलिसांना आहे. सत्ताधाऱ्याशी त्यांचा संबंध असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली नसल्याचे ते म्हणाले. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही हे कळून चुकल्याने पोलिसांनी एका मारेकऱ्याला अटक केली आहे. इतक नाही तर नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे मारेकरी सत्ताधारी पक्षाच्या जवळचे असल्याचा खळबळजनक आरोप देखील आंबेडकरांनी केला. 

काय म्हणाले आंबेडकर

> संविधान सर्वांपर्यंत पोहचवणार 
>धनगर,माळी, ओबीसी , मुस्लिम  या घटकांना जो उमेदवारी देईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ. फक्त तो पुरोगामी विचारांचा पक्ष असावा अशी आमची अट  
आगामी लोकसभा निवडणुकीत पुरोगामी संघटनासोबत आघाडी करणार
> जुलै महिन्याच्या नागपूर येथील अधिवेशनाला शिवसेनेचा विरोध आहे. जर शिवसेनेने या अधिवेशनावावर बहिष्कार टाकला तर सरकार पडेल
लोकसभेची निवडणूक मी लढवेल की नाही हे अजून माहीत नाही
> 48 मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी
> ज्योतिरादित्य सिंधिया किंवा कामलनाथ हे वेगवेगळी भाषा करत आहेत.गुजरात निवडणुकीतून काँग्रेस काहीच शिकली नाही. सिंधिया सर्वांना सोबत घेऊ म्हणत आहेत तर कामलनाथ सिलेक्टिव्ह पक्षांना सोबत घेऊ म्हणत आहेत 
> राज्यात तिसऱ्या आघाडीची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांनी पुरोगामी पक्षांना एकत्र येण्याचे केले आवाहन