Thu, Jul 18, 2019 16:28



होमपेज › Pune › महा-ई-सेवा केंद्र चालकाला लाच घेताना अटक

महा-ई-सेवा केंद्र चालकाला लाच घेताना अटक

Published On: May 18 2018 5:13PM | Last Updated: May 18 2018 1:27PM



राहु (पुणे) : वार्ताहर

राहु (ता.दौड़) येथील महा-ई-सेवा केंद्रचालकाला जातीच्या दाखल्यासाठी पैसे स्विकारताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. लक्ष्मण ताकवले असे केंद्रचालकाचे नाव आहे. 

तक्रारदार व्यक्तीच्या मुलाचा जातीचा दाखला काढण्यासाठी चालकाने अतिरिक्त पैशाची मागणी केली होती. आज लाचलुचपत पथकाच्या अधिकारी तसेच पंचाच्या समोर लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले.