Fri, Feb 22, 2019 04:14होमपेज › Pune › महानगरपालिका राबविणार ‘ई-वेस्ट’ संकलन महाअभियान 

महानगरपालिका राबविणार ‘ई-वेस्ट’ संकलन महाअभियान 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात ‘ई-वेस्ट’ची (इलेक्ट्रॉनिक्स कचरा) वाढती समस्या व त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात ‘ई-वेस्ट संकलन’ महाअभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान 17 डिसेंबरला  शहरातील विविध 14 ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत राबविण्यात येणार आहे.  

महापालिकेकडून ‘ई-वेस्ट’ गोळा करण्याकडे दुर्लक्ष केले जात असून, त्याचे घातक परिणाम शहराच्या आरोग्यावर होत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धन समितीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत दोन बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये हे अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले. भोसरी येथील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात गुरुवारी (दि.23) बैठक झाली. या वेळी क्षेत्रीय कार्यालय समिती अध्यक्षा भीमा फुगे,  विकास पाटील, पुरुषोत्तम पिंपळे, प्रभाकर मेरूकर, मनपा आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, कमिन्स इंडिया कंपनीचे अधिकारी संपत खैरे, नितीन साबळे, रणजित भगत, विकास आंबले; तसेच हाऊसिंग सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

‘ई-वेस्ट’ संकलन महाअभियानाबाबत सविस्तर माहिती व महाअभियानाचे स्वरूप स्पष्ट करताना पाटील यांनी ‘ई-वेस्ट’चे मानवी आरोग्यावर होणार्‍या परिणामाची माहिती दिली. शहरात साठून राहिलेले ‘ई-वेस्ट’ भंगार साहित्य खरेदी करणारे हातगाडीवाले यांना न देता ते शास्त्रीय पद्धतीने विघटन करणार्‍या यंत्रणांना दिले जावे, याबाबत जनजागरण करावे. 

‘ई-वेस्ट’ संकलनासाठी शहरात 200 केंद्रे

या अभियानांतर्गत शहरात एकूण 200 ‘ई-वेस्ट’ संकलन केंद्रे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उभारली जाणार आहेत. या सर्व केंद्रांवर महाविद्यालयीन विद्यार्थी मदत व जागृती करण्यासाठी नेमण्यात येणार आहेत. ज्या हाऊसिंग सोसायटी आणि वसाहतींकडून 100 किलोपेक्षा अधिक ‘ई-वेस्ट’ देण्यात येईल, अशा वसाहतींचा समितीकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.