Wed, Jan 23, 2019 04:43होमपेज › Pune › एमपीएससी : ऑक्टोबरच्या वेळापत्रकात बदल

एमपीएससी : ऑक्टोबरच्या वेळापत्रकात बदल

Published On: Aug 18 2018 11:04AM | Last Updated: Aug 18 2018 11:04AMपुणे : प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) नागरी मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी या दोन पदांची मुख्य परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार एकाच दिवशी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एमपीएससीने दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

परीक्षा एकाच दिवशी होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. बदललेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (राज्य कर निरीक्षक) येत्या २० ऑक्टोबरला, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (सहायक कक्ष अधिकारी) २७ ऑक्टोबरला होणार आहे.

विद्यार्थ्यांची संधी वाया जाऊ नये, यासाठी वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आयोगाचे सचिव सुनील अवताडे यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.