Fri, May 24, 2019 08:54होमपेज › Pune › ... तर प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे

... तर प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे

Published On: Jul 16 2018 6:18PM | Last Updated: Jul 16 2018 5:59PMपुणे : प्रतिनिधी

राणे समितीच्या अहवालाचा बट्टयाबोळ झाल्याचे विधान भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी मध्यंतरी केले होते. या विधानावर निलेश राणेंनी आज प्रतिक्रिया दिली. समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम ते करतात. त्यांना यामध्ये बोलण्याची गरज नाही. हा विषय आयोग आणि सरकारचा असताना आणि तुम्हाला कोणी विचारले नसताना त्यामध्ये उडी मारायची गरज नव्हती. मराठा आरक्षण हा आमचा अधिकार असून आंबेडकरांना पाठिंबा दयावाच लागतो, अन्यथः महाराष्ट्रात तुम्हाला राहता येणार नाही, असा टोला स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी लगावला.

सोमवारी आयोजित केलेल्या येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, त्यास उशीर व्हावा, म्हणून आंबेडकर यांच्यासारखे काही नेते विलंब करतात. त्यात मराठा तरुणांचे नुकसान होते. राणे समितीच्या जो अहवाल गेला, त्यावर चुकीचे स्टेटमेंट करतात. जेणेकरुन आमच्या समाजाला आरक्षण मिळण्यास वेळ लागावा किंवा ते आरक्षण मिळू नये म्हणून आंबेडकरांचे प्रयत्न असून आम्ही ते हाणून पाडू. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नारायण राणे यांच्यासह अनेक मराठा नेते, कार्यकर्ते हे पाठपुरावा, संघर्ष करीत आहेत. याविषयी उच्च न्यायालयानेही मराठा आरक्षणाचे काय झाले.? अशी विचारणा राज्य सरकारकडे केली आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि कोपर्डीतील आमच्या बहिणीला न्याय मिळावा ही आमची मागणी सरकारकडे मागणी आहे. अन्यथः मराठा समाज कोणत्याही थराला जावू शकतो.

कोपर्डीच्या येथील घटनेला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झालेली आहेत. या घटनेतील आरोपींवर हल्ला करणार्‍यांचे प्रकरण खूप गाजले. या प्रकरणी ज्या चार जणांना अटक करण्यात आली. त्यांना तीन आठवड्यापूर्वी जामीन मिळाला आहे. त्यांच्यामध्ये अमोल कुणे, गणेश कुणे, बाबू वाळेकर आणि राजू जराड अशी त्यांची नांवे आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मी अधिक भाष्य करणार नाही. मात्र, आमच्या बहिणीला न्याय मिळविण्यासाठी मराठे हे कोणत्याही टोकाला जावू शकतात. 

संभाजी भिडे यांच्याबद्दल काय वाटते असे छेडले असता ते म्हणाले की, जर कोणी महाराष्ट्राचे हिताचे बोलत असेल तर मला मान्य आहे. चुकीचे असेल तर अमान्य आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचे नाही.

आम्ही शेतकर्‍यांच्या बाजूनेच...

खासदार राजु शेट्टी यांच्या दुधाला पाच रुपयांचे अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनावर बोलताना राणे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या मागणीसाठी स्वाभिमान पक्ष कायम त्यांच्या सोबत आहे. आज आम्ही शेतकर्‍यांबरोबर आहोत, कालही होतो आणि उद्याही असणार आहे. खा. शेट्टी यांनी दूध आंदोलनाचा निकाल लावावा, असेही ते म्हणाले.