Wed, Apr 24, 2019 15:33होमपेज › Pune › पालिकेतील इंग्रजी फलकांना मनसेने फासले काळे

पालिकेतील इंग्रजी फलकांना मनसेने फासले काळे

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 1:06AMपिंपरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शासनाने स्थानिक स्वराज संस्थेच्या कामकाजामध्ये मराठी भाषेच्या वापराची सक्ती केली आहे. परंतु, त्या आदेशाचे उल्लंघन करत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक विभागाच्या पाट्या व फलक हे इंग्रजी भाषेत आहेत. इंग्रजीतील पाट्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी (दि.21) शाई फेकत काळे फासले. मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी केली.पालिका भवनातील चौथ्या मजल्यावर असलेल्या ‘कॉम्प्युटर सर्व्हर रूम’च्या इंग्रजी फलकाला, संगणक विभागप्रमुख निळकंठ पोमण यांच्या कार्यालयाबाहेरील इंग्रजीतील फलकावर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाई फेकत काळे फासले.  तसेच आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

राज्य शासनाच्या आदेशानुसार पालिकेच्या कामकाजात मराठीचा वापर केलाच पाहिजे. पालिकेतील निविदा प्रक्रीया, ठेकेदारांचे करार, तसेच वर्कऑर्डर हे मराठीत दिले गेले पाहिजे. पालिका भवनातील प्रत्येक फलक हा मराठीतच असला पाहिजे. येत्या 15 दिवसांत याची अंमलबजावनी न करावी. अन्यथा तीव्र  आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. आंदोलनात मनसेचे रुपेश पटेकर, राजू सावळे, बाळा दानवल, मयूर चिंचवडे, हेमंत लांडगे आदी कार्यकर्त सहभागी होते.