आज बाळासाहेब असायला हवे होते : राज ठाकरे(Video)

Last Updated: Nov 10 2019 1:38AM
Responsive image


पुणे : प्रतिनिधी 

अयोध्या केस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अतिशय आनंद झाला. या निर्णयाचे स्वागत करतो, एक धाडसी निर्णय घेतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन करतो. आता लवकरात लवकर राम मंदीर बांधावे आणि सरकारने देशात रामराज्य आणावे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. राज ठाकरे म्हणाले, राम मंदिर उभारणीसाठी ज्या कारसेवकांनी बलिदान दिले, ते कुठेतरी आज सार्थकी लागले. इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा प्रश्न आज निकाली लागला. आता लवकरात लवकर राम मंदिर व्हायला हवे. तसेच रामराज्य आणावे. ज्या काही लोकांचे रोजगार जात आहेत, किंवा इतर गोष्टी होत आहेत त्या संपायला हव्यात, असे ठाकरे यावेळी म्हणाले. 

राम मंदिर बाबतचा निर्णय आल्यानंतर जर मनापासून काही वाटले असेल, ते म्हणजे हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

Image may contain: text

पल्लकडमधील हत्तीण मृत्यू प्रकरणी एकाला अटक


पुढील एक वर्ष केंद्राकडून कोणतीही नवी योजना सुरु होणार नाही : अर्थमंत्रालय 


माहूर तालुक्यात बाहेरून आलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह 


प्रियांका चोप्राच्या बहिणीला 'रेप'ची धमकी, कारण तर पाहा


आयपीएल भारताबाहेर खेळवण्याच्या विचारात बीसीसीआय?


अकोल्यात नव्या १४ कोरोना रुग्णांची वाढ 


कर्नाटक, झारखंडला एकाचवेळी भूकंपाचे धक्के 


कोल्हापूर : ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचा विचार न घेता कोरोनाची उपकरणे लादण्याचा घाट


नवी मुंबईत पावसाची विश्रांती, खुल्या मैदानातील भाजी मार्केट पुन्हा सुरू


कुडाळमध्ये पुरुषांनी साजरी केली वटपौर्णिमा