Thu, Jun 20, 2019 00:31होमपेज › Pune › आमदार पुत्राला चापट ; महिला अधिकार्‍याच्या अंगलट 

आमदार पुत्राला चापट ; महिला अधिकार्‍याच्या अंगलट 

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 1:04AMपिंपरी : वाढदिवसानिमित्त फटाके फोडणार्‍या आमदारपुत्राला मारलेली चापट महिला पोलीस अधिकार्‍याच्या चांगलीच अंगलट आली आहे. याबाबत खात्यातील वरिष्ठांनी त्या महिला अधिकार्‍याचा खुलासा घेऊन ‘सक्त ताकीद’ दिली आहे. 

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 21 ऑक्टोबर रोजी पिंपरी विधानसभेतील शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा मुलगा सुमेध याचा वाढदिवस होता. सुमेध रात्री पावणे एकच्या सुमारास आपल्या नातेवाईक आणि मित्रांसोबत नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावर फटाके फोडण्यासाठी आला. यावेळी गस्तीवर असलेल्या भोसरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांनी सुमेधला फटाके फोडण्यास मनाई केली. त्यावर आम्ही आमदाराची मुले आहोत येथे वाढदिवस साजरा करणार असे सुमेधने उलट उत्तर दिले. त्यावर पाटील यांनी सुमेधकडे वाहन चालवण्याचा परवाना मागितला. परवाना घरी असल्याचे सांगताच पाटील यांनी सुमेधला एक चापट मारल्याचा आरोप आमदार गौतम चाबुकस्वार यांनी वरिष्ठांकडे केला होता. त्यावरून पाटील यांची खातेअंतर्गत चौकशी करण्यात आली. यामध्ये पाटील यांनी सुमेधला चापट मारल्याचे निष्पन्न झाले आहे. पाटील यांनी सुमेधवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना परिस्थिती योग्य रीतीने न हाताळल्याने त्यांना ‘सक्त ताकीद’ देण्यात आली आहे.