Sun, Aug 25, 2019 08:09होमपेज › Pune › आ. लांडगेंचे मतदारसंघात ‘सोशल इंजिनिअरिंग’ 

आ. लांडगेंचे मतदारसंघात ‘सोशल इंजिनिअरिंग’ 

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 11 2018 11:13PMपिंपरी :  संजय शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्ता आल्यानंतर विविध पदाच्या बाबतीत सोशल इंजिनिअरिंग वापर करत समाजातील सर्व घटकांना मंत्री मंडळात स्थान दिले. त्याचेच अनुकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात  केले. त्याचा कित्ता पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात येणार्‍या भोसरी मतदार संघात आ. महेश लांडगे यांनी विविध समाजातील नगरसेवकांना संधी देत केंद्राचा आणि राज्याचा कित्ता गिरवला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान यांच्या पावलावर पाऊल ठेऊन सर्व जाती धर्माना बरोबर घेण्यासाठी दलित, मुस्लिम, इतर मागास वर्गातील आमदार, खासदार याना पदाधिकारी, कार्यकर्तेना  विविध संघटनेची पदे देऊन पक्षात सन्मानाची पदे देऊन काम करण्याची संधी दिली. त्यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ओढा कमी होऊन त्यांचा ओढा भारतीय जनता पार्टीकडे विविध निवडणुकीच्या अनुषंगाने दिसून येत आहे.

महापालिका क्षेत्रात ही भाजप त्यामध्ये आघाडीवर असून पिंपरी-चिंचवड महापालिकेत भोसरी विधानसभा मतदार संघात आ.महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली विविध समाजाच्या नगरसेवकांना काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये महापौर नितीन काळजे (कुणबी मराठा), स्थायी समिती सदस्य म्हणून साधना मळेकर, नम्रता लोंढे, यशोदा बॉईनवड (तिघेही इतर मागास वर्ग (ओबीसी), विकास डोळस (एससी), सारिका लांडगे (खुला), विषय समिती सभापती स्वनिल म्हेत्रे (महिला बालकल्याण), संजय नेवाळे (क्रीडा समिती), भीमाताई फुगे (इ क्षेत्रीय अध्यक्ष), नम्रता लोंढे (क क्षेत्रीय अध्यक्ष) याना संधी देण्यात आली आहे.शहराध्यक्ष आ.लक्ष्मण जगताप, सहयोगी सदस्य आ. महेश लांडगे हे पालिकेचे कारभारी आहेत. परंतु पालिकेतील पदाधिकारी निवडीत आ.लांडगे यांनी बाजी मारली आहे; परंतु आ.जगताप गटाकडे पालिकेच्या आर्थिक चाव्या आहेत.