होमपेज › Pune › ‘नीट’वर नीट नजर राहणार

‘नीट’वर नीट नजर राहणार

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 18 2018 11:05PMपुणे : प्रतिनिधी 

नीट परीक्षेनंतर राज्य सरकार वैद्यकीय शिक्षण प्रवेशामध्ये  राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न करतेय, मात्र आधी  महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्राधान्य मिळायला हवे. जर परराज्यातील मुलांना प्रवेश देण्याचा प्रयत्न झाला तर त्या विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष राहील असा धमकीवजा इशारा महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे अध्यक्ष राज्य ठाकरे यांनी मंगळवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. नीट परीक्षेबाबत  इतर राज्यांनी कायदा केला आहे, मग महाराष्ट्रात असा कायदा का नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. महाराष्ट्रातील मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही आणि राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीकासुध्दा त्यांनी केली. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस मराठवाड्याच्या दौर्‍यावर जाणार आहेत. तत्पूर्वी  त्यांची पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ठाकरे यांनी विविध प्रश्‍नांवरून राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेला प्रवेश देण्यासाठी दहावी-बारावी उत्तीर्ण असले पाहिजे, तसेच डोमासाईलची सक्ती राज्य शासन करीत आहे, ही बाब  गंभीर आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात जास्त वैद्यकीय महाविद्यालये असून, जर मुलांना प्रवेश मिळत नसेल तर या  मुलांनी जायचे कुठे? असा सवाल त्यांनी केला. तमिळनाडूमध्ये नीट परीक्षा त्यांच्याच भाषेत होते. तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर त्यांचे लोकप्रतिनिधी न्यायालयात जातात. असे  असताना राज्यातील आमदार, खासदार याबाबत काहीही काम करीत नाहीत. हे काम राज्य सरकारचे आहे, मात्र  राज्यकर्त्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टीका त्यांनी या वेळी केली.भगवतगीता वाटप आणि राममंदिर उभारण्याचा मुद्दा चार वर्षांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर  भाजपला का सूचतो? राममंदिर व्हावे, ही आमचीसुद्धा इच्छा आहे, पण तो निवडणुकीचा कार्यक्रम म्हणून राबवू नये, असा टोला त्यांनी  लगावला.

भाजप कार्यकर्त्यांना पट्ट्याने फोडले तर चालेल का ?

मनसेच्या कार्यकर्त्यांनी पावसामुळे रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन केले. मात्र, आमच्या आंदोलकांना शर्मा आणि मिश्रा नावाचे पोलिस अधिकारी  थर्ड डिग्री देतात. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. सत्तेतून पायउतार झाल्यावर त्यांनादेखील विरोधात बसावे लागेल. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तर त्यांना  पट्ट्याने फोडले तर चालेल का, असा सवालही ठाकरे  यांनी केला.

दूध आंदोलकांची बैठक का बोलाविली नाही ?

राज्यात दूध आंदोलन पेटणार आहे, हे माहिती असूनसुद्धा राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले ही बाब अक्षम्य आहे. गुजरातमधील अमूल दूध महाराष्ट्रात घुसविण्याचे प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण राज्याच्या कारभार केंद्र सरकार चालवित आहे. सरकारला दूध आंदोलन पेटणार आहे, हे माहित होते, मात्र त्यासाठी बैठक का बोलाविली नाही, असा सवाल करून ठाकरे म्हणाले