Wed, Nov 21, 2018 13:23होमपेज › Pune › लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा गुरुकुलममधील विद्यार्थ्यांशी संवाद

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा गुरुकुलममधील विद्यार्थ्यांशी संवाद

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 11:58PMपिंपरी : प्रतिनिधी

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन या नुकत्याच पिंपरी-चिंचवड शहर दौर्‍यावर आल्या असताना त्यांनी चिंचवड येथील चापेकर स्मारक समितीच्या वतीने चालविण्यात येणार्‍या पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे संस्थापक गिरीश प्रभुणे, चापेकर समितीचे कार्यवाह  सतीश गोरडे, सहकार्यवाह रवी नामदे आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी महाजन यांच्यासमोर भगवद्ग्गीतेतील 15 व्या अध्यायाचे न अडखळता पठण केले. गिरिष प्रभूणे यांनी यावेळी गुरुकुलममधील शिक्षणपद्धतीबाबत महाजन यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित दिल्या जाणार्‍या प्रशिक्षण विभागाची माहिती घेऊन गुरुकुलममध्ये पारंपरिक शिक्षणाची सांगड घालून नवी पिढी तयार करण्याचे काम कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत  महाजन यांनी कौतुकोद‍्गार काढले.