Thu, Jun 20, 2019 06:36होमपेज › Pune › ३१ मेपर्यंत लोकल रद्द

३१ मेपर्यंत लोकल रद्द

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 12:09AMपुणे : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाअंतर्गत येणार्‍या पुणे ते लोणावळादरम्यान लोहमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. इंजिनिअरिंग, सिग्नल, ओएचई विभागाद्वारे विविध तांत्रिक कामे करण्यात येणार असून, पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान धावणार्‍या सहा लोकल दि. 1 मे ते 31 मे दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.

पुण्याहून लोणावळ्याकरिता दुपारी 12.15, 1 व 3 वाजता सुटणार्‍या लोकल, लोणावळा येथून पुण्याकरिता दुपारी 2, 3.40 व तळेगावहून पुण्याकरिता सायंकाळी 4.38 वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. या दरम्यान पुण्याहून तळेगावकरिता दुपारी 3.40 वाजता सुटणारी लोकल लोणावळ्यापर्यंत जाणार आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.