Fri, Jul 10, 2020 20:49होमपेज › Pune › मृताच्या नावावर घेतले अडीच कोटींचे कर्ज

मृताच्या नावावर घेतले अडीच कोटींचे कर्ज

Published On: Dec 14 2017 12:43PM | Last Updated: Dec 14 2017 12:42PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

मार्केट यार्ड येथील सोलापूर जनता सहकारी बँकेकडे मृत व्यक्‍तीची बनावट कागदपत्रे सादर करून  बँकेकडून 2 कोटी 63 लाख 26 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेला गंडा  घातल्याप्रकरणी एकाला  मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 17 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. मनोज नामदेवराव कड (29, रा.
मु. पो. सोरतापवाडी, कडवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे.

याबाबत दशरथ गंगाराम कटकम (63, रा. वारजे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.दि. 19 मार्च 2016 ते आजपर्यंत सोलापूर जनता सहकारी बँकेत हाप्रकार घडला. मनोज कड  ने सोपान बाबूराव  कड ही व्यक्‍ती मृत असल्याचे माहिती असतानासुद्धा मृत व्यक्‍तीच्या निवडणूक ओळखपत्रावर दुसर्‍या व्यक्‍तीचा फोटो लावून खोटे व बनावटनिवडणूक ओळखपत्र व कागदपत्रे तयार केली. तसेच सोपान कड यांच्याऐवजी दुसर्‍या व्यक्‍तीला बँकेत हजर करून त्यांच्या खोट्या सह्या करण्यास भाग  पाडून बँकेकडून 2 कोटी 63 लाख  6 हजारांचे कर्ज मिळविले. कर्जाच्या पैशातून जमीन खरेदी केल्याची बाब समोर आली असून ज्या व्यवसायासाठी कर्जघेण्यात आले त्या कारणासाठी वापर  केला नसल्याचेही  पोलिस तपासामध्येनिष्पन्न झाले आहे. गुन्ह्याचा अधिकतपास करण्यासाठी सरकारी वकीलसंजय दीक्षित यांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर  केली.