Fri, Apr 26, 2019 15:18होमपेज › Pune › पुण्यात गव्हाणी घुबडास जीवदान

पुण्यात गव्हाणी घुबडास जीवदान

Published On: Dec 26 2017 2:56PM | Last Updated: Dec 26 2017 2:56PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मच्छीन्द्र तापकीर यांच्यामुळे आज एका गव्हाणी घुबडास जीवदान मिळाले. काळेवाडी तापकीर नगर येथील लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयाशेजारी कम्पाऊंडमध्ये हे घुबड आढळून आले. त्याला लहान मुले दगड मारत होती, त्‍यावेळी माजी विरोधी पक्षनेते मच्छीन्द्र तापकीर तेथे आले त्यांनी त्या घुबडास  ताब्‍यात घेवून प्राणीमित्र योगेश कांजवणे यांच्याकडे सुपूर्द केले.