Wed, May 22, 2019 22:21होमपेज › Pune › विरोधी पक्षामुळे अधिवेशनात संसदेचे कमी कामकाज : अमर साबळे 

विरोधी पक्षामुळे अधिवेशनात संसदेचे कमी कामकाज : अमर साबळे 

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 1:04AMपिंपरी : प्रतिनिधी 

विरोधकांनी कामकाज चालू न दिल्याने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशच्या दुसर्या सत्रात दोन्ही सभागृहाचे कामकाज फक्त 12 टक्के चालले. देशाचा विकास रोखण्याचे काम विरोधी पक्षकाने केले असल्याचा आरोप भाजपाचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी रविवारी (दि.8) पत्रकार परिषदेत केला. तसेच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन्ही सभागृहात  मिळून 78 तास चालले. तर तब्बल 248 तास कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान लोकसभेत 5 आणि राज्यसभेत 1 विधेयक मंजुर करण्यात आल्याचेही साबळे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत भाजपाचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ऍड सचिन पटवर्धन, नगरसेवक संदीप वाघेरे, उत्तम केंदळे, विलास मडिगेरी, नामदेव ढाके, स्विकृत नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, भाजपचे शहर प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते. 

संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचे कामकाज 23 तर राज्यसभेचे कामकाज 28 टक्केच चालले. पहिल्या सत्रात लोकसभेचे कामकाज 134 टक्के तर राज्यसभेचे कामकाज 96 टक्के चालले, दुसर्या सत्रात लोकसभेचे कामकाज 4 टक्के आणि राज्यसभेचे कामकाज 8 टक्के चालले. लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 एप्रिल 2018 रोजी काही काळासाठी तहकूब करण्यात आले. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात लोकसभेच्या 7 आणि राज्यसभेच्या 8 बैठका झाल्या. 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 10 तास 43 मिनिटे चर्चा झाली. राज्यसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणांवरील चर्चेला प्रारंभ अमित शाह यांनी केला. 1 फेब्रुवारी 2018 रोजी सभागृहात अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा झाली. 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहात चर्चा केली. लोकसभेत 12 तास 13 मिनिटे तर राज्यसभेत 9 तास 35 मिनिटे चर्चा झाली.  संसदेत ठेवलेल्या सर्व प्रश्नावर चर्चा करण्याची सरकारची तयारी होती. मात्र विरोधी पक्षानी चर्चा होऊच दिली नाही. नागरिकांची, देशवासीयांसाठी प्रामाणिकपणे काम करणे ही आमची जबाबदारी आहे, मात्र ती जबाबदारी पार पाडू शकलो नाही. त्यामुळे एनडीमधील सव पक्षांच्या खासदारांनी कामकाज न चाललेल्या वेळेचे मानधन न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे यांनी सांगितले.

 

Tags : pune, pune news, parliamentary work, opposition party, Amar Sable,