Wed, Jun 26, 2019 11:22होमपेज › Pune › करडेत बिबट्याचा दीड तास ठिय्या

करडेत बिबट्याचा दीड तास ठिय्या

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 25 2017 12:43AM

बुकमार्क करा

निमोणे : वार्ताहर

शिरूर तालुक्यातील करडे येथे लोकवस्तीत बिबट्याने तब्बल दीड तास ठाण मांडल्याने नागरिकांची पाचावर धारण बसण्याची वेळ आली. 

परिसरात सध्या ज्वारीची पिके जोमात असल्याने बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्री- अपरात्री पाळीव कोंबड्या, बकरी, कुत्री यांच्यावर झडप घालून बिबट्या पोबारा करीत असल्याची चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहे. मात्र शनिवारी (दि. 23) सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान औद्योगिक वसाहतीच्या जलवाहिनीवर बिबट्याने जवळपास दीड तास मुक्‍काम ठोकल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या करडे गावात बिबट्या मोकाट फिरतोय, या पध्दतीने सोशल मिडीयावर पोस्ट फिरू लागल्याने कामगारवर्गात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दरम्यान वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेंन्द्र जगदाळे यांनी वन विभागाकडे केली आहे.