होमपेज › Pune › आरक्षण सोडतीमुळे मातब्बरांची दांडी गूल

आरक्षण सोडतीमुळे मातब्बरांची दांडी गूल

Published On: Apr 14 2018 10:30AM | Last Updated: Apr 13 2018 11:44PMवडगाव मावळ  : वार्ताहर 

नवनिर्मित वडगाव नगरपंचायतच्या पहिल्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 13) काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमुळे शहरातील अनेक मातब्बर इच्छुकांची दांडी गूल झाली असून, खुल्या प्रवर्गासाठी केवळ चार जागा मिळाल्या आहेत. 

प्रांताधिकारी सुभाष भागडे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार रणजीत देसाई, नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महसूल भवनमध्ये प्रारुप प्रभाग रचनेनुसार अनुसुचित जाती व जमातीची लोकसंख्या व चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली. 

यावेळी, सभापती गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अविनाश बवरे, राष्ट्रवादी सहकार सेलचे तालुकाध्यक्ष सुभाषराव जाधव, माजी जि.प.सदस्य चंद्रशेखर भोसले, माजी उपसभापती प्रवीण चव्हाण आदिंसह इच्छुक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन 2011 च्या जनगनणेनुसार शहराची लोकसंख्या 15 हजार 141 असून अनुसुचित जातीची लोकसंख्या 1427 तर अनुसुचित जमातीची लोकसंख्या 607 इतकी आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार तहसीलदार देसाई यांनी सर्वप्रथम प्रभाग क्र.1 हा अनुसुचित जमातीसाठी तर प्रभाग क्र.7 व 14 हे अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाल्याचे सांगितले.

यानंतर अनुसुचित जाती स्त्री उमेद्वारांसाठी साठी टाकण्यात आलेल्या चिठ्ठीमध्ये प्रभाग क्र.14 ची चिठ्ठी निघाल्याने तेथील आरक्षण अनुसुचित जाती स्त्री उमेद्वारासाठी निघाले. यानंतर उर्वरित 14 प्रभागांच्या चिठ्ठ्या टाकून त्यामधून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 5 चिठ्ठ्या उचलण्यात आल्या.    

यामध्ये प्रभाग क्र.4 व 11 हे नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी तर प्रभाग क्र.3, 5 व 8 हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री जागेसाठी आरक्षीत झाले. तसेच,चिठ्ठीनुसार प्रभाग क्र.6,10,13,16, व 17 हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत झाले व प्रभाग क्र.2, 9, 15 व 12 हे सर्वसाधारणसाठी खुले राहिले आहेत.

प्रभागनिहाय आरक्षण

प्रभाग 1 : अनु.जमाती(केशवनगर पश्‍चिम भाग, भैरवनाथनगर,  पवारवस्ती, ढोरेवस्ती), 
प्रभाग 2 : सर्वसाधारण (कातवी गाव, केशवनगर पूर्व, अष्टविनायक सोसा.), 
प्रभाग 3 : नामाप्र स्त्री(केशवनगर दक्षिण भाग, मधुबन, मोरयाचौक), 
प्रभाग 4 : नामाप्र(गणपती मंदिर ते कुंभारवाडा, ढोरेवाडा ते म्हाळसकर काँम्प्लेक्स ते राजमाचीकर), 
प्रभाग 5 : नामाप्र स्त्री(इन्नूस मोमीन ते ढोरेवाडा, दंडेलवाडा, संजय वहिले ते निलेश म्हाळसकर ते ढोरेवाडा), 
प्रभाग 6 : सर्वसाधारण स्त्री(रेल्वेगेट ते साहनी स्कूल, पंचमुखी कॉलनी ते शिवाजी चौक), 
प्रभाग 7 : अनु.जाती(कुडेवाडा ते मिलींदनगर, लक्ष्मीनगर ते वडगाव फाटा)
प्रभाग 8 : नामाप्र स्त्री(पाटीलवाडा, म्हाळसकरवाडा, गुरववाडा ते कु डेवाडा)
प्रभाग 9 : सर्वसाधारण (महादेव मंदिर ते चावडीचौक ते गुरववाडा, इंद्रायणीनगर, बवरेवाडा)
प्रभाग 10 : सर्वसाधारण स्त्री(महादजी शिंदे स्मारक ते विजयनगर ते दत्तनगरी ते तहसिल कार्यालय)
प्रभाग 11 : नामाप्र (पोटोबा मंदिर ते शांतीदिप सोसायटी ते माळीनगर शिक्षक सोसायटी,  ब्राम्हणवाडी हद्द)
प्रभाग 12 : सर्वसाधारण ( माळीनगर दक्षिण भाग, ढोरेवस्ती, सायप्रॉन सोसायटी, ठाकरवस्ती)
प्रभाग 13 : सर्वसाधारण स्त्री(भेगडेलॉन्स ते भोसलेवस्ती, ढोरेवस्ती, भिलारेवस्ती)
प्रभाग 14 : अनु.जाती स्त्री (विजयनगर, भेगडेवस्ती, दिग्वीजय कॉलनी, ठोंबरेवस्ती)
प्रभाग 15 : सर्वसाधारण ( न्यू इंग्लिश स्कूल ते टेल्कोकॉलनी, चव्हाणनगर, कुडेवस्ती, ठाकरवस्ती)
प्रभाग 16 : सर्वसाधारण स्त्री(स्मशानभूमी ते एमआयडिसी रस्ता ते टाटा हौसिंग ते उर्से हद्द, म्हाळसकरवस्ती ते वडगाव फाटा)
प्रभाग 17 : सर्वसाधारण स्त्री(एमआयडिसी रस्ता, विशाल लॉन्स ते हरणेश्‍वर टेकडी म्हाळसकर वस्ती, चिंतामणीनगर, मोरया कॉलनी ते तळेगाव फाटा, लिटाका कंपनी ते टाटा हौसिंग रस्ता)

 

Tags : pune, pune news, Vadgaon Maval, Municipal Council, reservation,