होमपेज › Pune › पुणेकर होणार आगीपासून मुक्त

पुणेकर होणार आगीपासून मुक्त

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 12:40AMपुणे : प्रतिनिधी 

राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहानिमित्त पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे अग्नीशामक विभाग आणि जागतिक पातळीवर विना नफा तत्वावर चालवल्या जाणार्‍या सेफ किड्स फाऊंडेशनने संयुक्तरीत्या शहरभरात आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या सप्ताहांतर्गत हनीवेलच्यावतीने सेफ किड्स अ‍ॅट होम अभ्यासक्रमातील आगीपासून सुरक्षित राहण्याचे धडे दिले जातील.

पुणे अग्निशमनचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यावेळी बोलताना म्हणाले की, . आमचा विभाग नेहमीच आगीच्या प्रत्येक घटनेचा मुकाबला करण्यासाठी तसेच आणिबाणीच्या प्रसंगांसाठी सज्ज असतो. 

आपत्ती प्रतिबंधक उपायांच्यामुळे नेहमीच विकास आणि शाश्वततेची ग्वाही मिळत असते. यासाठीच गेल्या तीन वर्षांपासून आम्ही शहरातील नागरिकांच्यात आणि प्रामुख्याने मुलांना याबाबत विशेष जागृत बनवत आहोत.सेफ किड्स फाऊंडेशनचे कार्यक्रम संचालक डॉ. सिंथीया पिंटो यांनी म्हणाल्या की,  प्रत्येक वर्षी या कार्यक्रमात पुणेकर नागरिकांचा वाढता सहभाग ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. यावर्षीच्या उपक्रमांमधून 7,00,000 हून अधिक नागरिकांना लाभ होईल अशी अपेक्षा आहे. 

हनीवेल इंडियाचे अध्यक्ष विकास चढ्ढा म्हणाले, “हनीवेलकडे अनेक दशकांचा फायर सेफ्टी अनुभव आहे. आमच्या जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानामुळे आणि स्थानिक पातळीवरील ज्ञानामुळे कुटुंबे आणि घरे सुरक्षित राहू शकत आहेत.राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहांतर्गत दि. 14 ते 20 एप्रिल या कालावधीत रॅलीज, पथनाट्य, प्रदर्शने, आग सुरक्षाविषयक कार्यशाळा, मुलांसाठी कार्निवल्स, मॉल इवेंट्स, मॉडेल आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा आदी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलले आहे. 

यासोबतच सेफ किड्स फाऊंडेशन आणि अग्नीशामक विभाग यांच्याकडून शहरातील आगीच्या घटनांवेळी ती शमवण्यासाठी मदत करणार्या 150 अग्नी सुरक्षा मित्रांनाही विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

 

Tags : pune, pune news, fire, safe, Learning,