Thu, Apr 25, 2019 17:30होमपेज › Pune › पुणे : पालिकेच्या इभ्रतीला गळती (Video)

पुणे : पालिकेच्या इभ्रतीला गळती (Video)

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 2:11AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीच्या उद्घाटनाच्या दिवशीच नवीन सभागृहाला गळती लागली. समारंभ सुरू असतानाच पावसाचे पाणी थेट सभागृहात गळायला सुरुवात झाल्याने, पदाधिकारी आणि प्रशासनाची पंचाईत झाली. उद्घाटनासाठी घाईगडबडीत करण्यात आलेले हे काम निकृष्ट झाल्यानेच पालिकेच्या इभ्रतीलाही गळती लागल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

नवीन विस्तारित इमारतीचे काम अर्धवट अवस्थेत असतानाच सत्ताधारी भाजपने घाईघाईने उद्घाटन समारंभ आयोजित केला. राष्ट्रवादी काँग्रेसने इमारतीमधील अनेक कामे अर्धवट अवस्थेत असल्याने उद्घाटनाची घाई करू नये, अशी मागणीही केली होती. मात्र, उपराष्ट्रपतींनी उद्घाटनासाठी वेळ दिल्याने, रात्रंदिवस काम करून घाईगडबडीत सभागृहाचे कामकाज उरकण्यात आले. मात्र, या घाईगडबडीत झालेल्या निकृष्ट कामाचा फुगा ऐन उद्घाटन समारंभातच फुटला. 

संबंधितांवर कारवाई करू : महापौर

नवीन सभागृहाच्या छतावर असलेल्या कचर्‍यामुळे पावसाचे पाणी अडले गेले आणि त्यामुळे पाण्याची गळती झाली, याप्रकरणी जबाबदार असलेल्या संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे महापौर मुक्‍ता टिळक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.